Type Here to Get Search Results !

लोकसभेत बारामतीची जागा लढणारच; ‘या’ राष्ट्रवादी नेत्याचं आव्हान




मुंबई :  आज कर्जत येथील पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात अजित पवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या चारही जागा आमचा गट लढवणार असल्याचंही अजित पवारांनी जाहीर केलं आहे. 


अजित पवार यांची ही घोषणा बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आलेलं आव्हान समजलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


कुटुंबातील एक व्यक्ती बारामतीसारख्या जागेवर जिथं तुम्ही खासदार आहात, तिथं आमचा पक्षही निवडणूक लढवणार आहे, असं म्हणतो त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या की, "आमची नाती आणि आमचं प्रोफेशन वेगळं आहे. या दोन्हीमध्ये कधीच गल्लत करायची नसते.


 लोकशाहीत कोणीतरी माझ्याविरोधात लढणारच. त्यामध्ये गैर काय? कोणीतरी लढलंच पाहिजे, असा माझा आग्रह राहणार आहे. ही वैयक्तिक लढाई नाही, ही वैचारिक लढाई आहे. कोण योग्य आहे, हे बारामतीची आणि महाराष्ट्राची जनता ठरवेन."



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies