Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या खानापूर-आटपाडी विधानसभा प्रमुखपदी प्रणव गुरव यांची निवड



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील प्रणव गुरव यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या खानापूर-आटपाडी विधानसभा प्रमुखपदी प्रणव गुरव यांची निवड करण्यात आली आहे. 


निवडीचे पत्र त्यांना खासदार संजयकाका पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हदेव पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा महामंत्री विलास काळेबाग, आटपाडीचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर यांच्या उपस्थित देण्यात आले.


प्रणव गुरव यांनी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी काम केले आहे. स्थानिक राजकारणामध्ये प्रवेश करत दिघंची ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये  सलग दोन वेळा विजय संपादन केला आहे.  त्यांनी पक्ष वाढीसाठी काम देखील केले आहे. 


त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खानापूर-आटपाडी विधानसभा प्रमुख पदी निवड केली आहे. निवडी नंतर प्रणव गुरव यांचे समाजातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies