Type Here to Get Search Results !

आटपाडी : शेअर मार्केट फसवणूक प्रकरण : आटपाडी पोलिसात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल ; एकाला अटक : आरोपींकडून एकवीस लाखाची फसवणूक





माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील चौघा विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून प्रकरणी एकाला अटक करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये यापूर्वी गुन्हा दाखल झालेला संतोष अडसूळ याचाही समावेश आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी कविता संजय चव्हाण, वय ४१ वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा. यपावाडी, ता. आटपाडी यांचे पती संजय चव्हाण यांचेसोबत यातील आरोपी गजानन आप्पासो गायकवाड यांनी ओळख करुन फिर्यादी तसेच त्यांचे पती यांना “ निहारीका फायनान्सीयल सर्व्हिसेस प्रा. लि” या शेअर मार्केट कंपनीबद्दल माहिती देऊन सदर कंपनीमध्ये पैसे गुंतवणुक केलेस १० महिन्यात रक्कसम दामदुपट करुन मिळेल असे खोटे आमिष दाखवुन त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांचे सांगली जिल्हा मध्यवर्ती शाखा, करगणी येथील शाखेतुन आरोपी गजानन आप्पासो गायकवाड यांचे आयसीआयसीआय बँक शाखा, करगणी येथील अकाऊंटवर वेळोवेळी २१,००,०००/- रुपये रक्काम पाठविणेस सांगितले.


रक्काम पाठविलेवर त्याचा परतावा म्हणुन आरोपी दिपाली गजानन गायकवाड हिने तिचे गुगल पे अकाऊंटवरुन फिर्यादी हिस ८०,०००/- रु इतकी रक्कम पाठविली असुन आरोपी ऋतिक दिलीप शिंदे याने ३५,०००/- रु. इतकी रक्कयम रोख स्वरुपात फिर्यादी यांचे पतीस दिलेले असल्याचा गुन्हा दाखल आहे.


यातील आरोपी गजानन आप्पासो गायकवाड, रा. शेटफळे यास पोलीस ठाणेकडील तपास करणारे दादासाहेब ठोंबरे, भोईनवाड यांनी शिताफीने पकडुन आरोपीकडे गुन्ह्याचे अनुशंगाने तपास केला असता त्याने सदरचे २३ लाख इतकी रक्कवम अकाऊंटवर घेऊन संतोष आडसुळ यास दिले असलेचे सांगितले आहे. 


संतोष आडसुळ हा सुमारे २ वर्षापासुन फरार आहे. अटक करण्यात आलेला आरोपी गजानन आप्पासो गायकवाड यास आज रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयांनी आरोपी गजानन आप्पासो गायकवाड यास दि. ०२ फेब्रु. पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे.


सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक, जयवंत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दादासाहेब ठोंबरे हे करीत आहेत. अशा प्रकारे शेअर्स मार्केट बद्दल कोणाची फसवणुक झाली असलेस नागरिकांनी न घाबरता पोलीस ठाणेस येऊन तक्रार करावी असे आवाहन आटपाडी पोलिसांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies