Type Here to Get Search Results !

आटपाडी : जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर ; आटपाडी तालुक्यातून शिंदे गटाकडून “यांची” निवड जाहीर




माणदेश एक्सप्रेस न्यूज

मुंबई : सांगली जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. यामध्ये शिंदे शिवसेना गटाकडून आटपाडी तालुक्यामधून जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांची निवड जाहीर झाली आहे.



जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणार्या  जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.



या समितीत विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे समर्थक जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर खानापूर तालुक्यामधून आमदार अनिलभाऊ बाबर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या देखील निवडी करण्यात आल्या आहेत.



यापूर्वी आटपाडी तालुक्यामधून अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांचे समर्थक करगणी येथील उमेश पाटील यांच्या मातोश्री पुष्पा पाटील यांची निवड झाली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यामधून आता जिल्हा नियोजन समितीमध्ये तानाजीराव पाटील व पुष्पा पाटील हे दोन सदस्य असणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies