Type Here to Get Search Results !

ShivSena MLA Anil Babar : आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निधन : रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर-आटपाडी मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


आमदार अनिलभाऊ बाबर यांना त्रास होत असल्याने सांगली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या दु:खद निधनाने आटपाडी-खानापूर मतदार संघावर शोककळा पसरली आहे.


 २०१९ च्या निवडणूकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies