Type Here to Get Search Results !

आमदार अनिलभाऊ बाबर यांची अंत्ययात्रा विटा येथून ११.०० वाजता निघणार : “या” ठिकाणी होणार अंत्यविधी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : Shivsena MLA Anil Babar : खानापूर-आटपाडी मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


२०१९ च्या निवडणूकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते.


विटा येथून आज सकाळी ११.०० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. विटा येथील त्यांच्या निवासस्थानापासून ही अंत्ययात्रा सुरु होणार आहे. तर सायंकाळी ४.०० वाजता जीवन प्रबोधनी कॉलेज ग्राउंड गार्डी येथे अंत्यविधी होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies