Type Here to Get Search Results !

आजपासून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे होणार सर्वेक्षण : प्रगणकांना माहिती देण्याकरिता सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली जिल्ह्यातील संपूर्ण क्षेत्राकरिता मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरीता सर्व प्रगणक हे दिनांक 23 जानेवारी 2024 पासून घरोघरी जाऊन मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वेक्षण करणार आहेत. नागरिकांनी ओळखपत्र धारण केलेल्या प्रगणक यांना माहिती देण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्याकडील दिनांक 29 डिसेंबर 2023 च्या पत्रान्वये महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरिता सांगली जिल्ह्यामध्ये नियुक्त नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांचे प्रशिक्षण दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आले होते. 


तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम करणारे प्रगणक व पर्यवेक्षक यांना दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी नोडल अधिकारी यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रगणक यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्याकडून ओळखपत्र देण्यात आलेले असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे  प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies