माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : मोफत वाचनालयाचे माजी अध्यक्ष कै. बी.ए. भिंगे यांच्या स्मरणार्थ “आदर्श पतसंस्था सचिव” पुरस्कार चौंडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सचिव बालक तुकाराम डोईफोडे यांना जाहीर झाला आहे.
मोफत वाचनालयाचे माजी अध्यक्ष कै. बी.ए. भिंगे यांच्या स्मरणार्थ “आदर्श पतसंस्था सचिव” पुरस्कार दिला जातो. सदर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षीचा “आदर्श पतसंस्था सचिव” पुरस्कार हा चौंडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सचिव बालक तुकाराम डोईफोडे यांना जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कराचे वितरण हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशालीताई आवाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्य संघटक संजय परमणे, सांगली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष विवेक गुळवणी यांच्या उपस्थित पुरस्काराचे वितरण होणार आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक ०४ रोजी दुपारी १.०० वाजता आटपाडी येथील चौंडेश्वरी मंदिर येथे संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मोफत वाचनालयाचे अध्यक्ष एस.एन. पाटील, सहकार भारतीचे महामंत्री सतिश भिंगे, सहकार भरतीचे आटपाडी तालुकाध्यक्ष बाबासाहेब माळी, उपाध्यक्ष चंद्रकांत दौंडे यांनी केले आहे.