Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील “या” युवा नेत्याची जिल्हा नियोजन समितीवर निवड

 


माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : सांगली जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. यामध्ये शिंदे शिवसेना गटाकडून आटपाडी तालुक्यामधून जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील  तर अजित पवार गटाकडून पुष्पा पाटील यांची निवड जाहीर झाली होती. आता रासपचे नेते लक्ष्मण सरगर यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड जाहीर झाली आहे.


जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या  जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या होत्या.


यापूर्वी आटपाडी तालुक्यामधून अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांचे समर्थक करगणी येथील उमेश पाटील यांच्या मातोश्री पुष्पा पाटील यांची निवड झाली होती. पुन्हा आता करगणी येथील असणारे व रासपचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर यांची निवड जाहीर झाली आहे. 


त्यामुळे आता आटपाडी तालुक्यातून जिल्हा नियोजन समितीमध्ये तानाजीराव पाटील, पुष्पा पाटील व लक्ष्मण सरगर हे तीन सदस्य असणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies