Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची ता. आटपाडी येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आले. याबाबत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादीच्या राहते घरातून फिर्यादी यांची अपहरित मुलगी हीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी फूस लावून पळवून नेले आहे.


याबाबत आटपाडी पोलिसात फिर्यादीच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपी विरुद्ध  भा.द.स कलम 363 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies