Type Here to Get Search Results !

VIdeo : बच्चू कडू आणि पोलीस प्रशासनात राडा ; मैदानात आरक्षणावरून बच्चू कडू आक्रमक



प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदान प्रचार सभेसाठी देण्यात आले होते.  बच्चू कडू यांचे  उमेदवार दिनेश बुब यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. 


मात्र त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना नियमानुसार दिलेली परवानगी सुरक्षेचे कारण देऊन रद्द करण्यात आली आणि त्यानंतर या मैदानावर आता अमित शाह यांची सभा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.


अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य आमनेसामने आले आहेत. अमित शाह यांची उद्या सभा होणार असल्यामुळे याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आज बच्चू कडू त्यांच्या सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसह येथे आले असताना त्यांना पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला. 


आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी असतानाही आमची अडवणूक का करत आहात? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तसेच पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडू पोलिसांवरच संतापले. 


पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमची समजूत का घालत आहेत? अमित शाह यांच्या सभेसाठी जर परवानगी मिळाली असेल तर त्यांनी ती दाखवावी, अन्यथा ज्यांना परवानगी मिळाली आहे, त्यांना सभा घेऊ द्यावी, असे बच्चू कडू म्हणाले. मात्र पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना मैदानात येऊ दिले नाही. 


पोलीस आपले ऐकत नाहीत, हे पाहिल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाने दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांसमोरच फाडून टाकले. पोलिसांनी आपल्या गळ्यात भाजपाचा पट्टा घालावा आणि गाडीवर भाजपाचे झेंडे लावावेत, अशीही टीका बच्चू कडू यांनी केले. भाजपाच्या सांगण्यावरून पोलीस काम करत असून आम्हाला मैदानाबाहेर काढले जात आहे, असाही आरोप बच्चू कडू यांनी केला.

Video 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies