Type Here to Get Search Results !

दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडण्याचे काम भाजप खासदारांनी केले : विशाल पाटील ; औदुंबर येथील दत्त मंदिरामध्ये प्रचाराचा केला शुभारंभ



माणदेश एक्सप्रेस न्युज :  सांगली : दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्याचे काम खासदार संजयकाका पाटील यांनी केले असल्याची टीका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केली.  औदुंबर येथे मंगळवारी त्यांनी  प्रचार शुभारंभ केला. 


यावेळी ते म्हणाले, प्रचारासाठी केवळ दहा ते बारा दिवसांचा कालावधी मिळाला असला तरी माझी उमेदवारी जनतेची आहे. हा लढा सांगलीच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा आहे. गेल्या काही दिवसापासून वैयक्तिक संपर्कात आहे. जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली असल्याने मला फारशी चिंता उरलेली नाही. मला मिळालेले लिफाफा हे चिन्ह मतदारापर्यंत पोहचविण्यात कोणतीच अडचण वाटत नसून आहेराच्या स्वरूपात मला जनता मतदान करेल असा विश्वास वाटतो असे ते म्हणाले.


प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर  त्यांनी जत तालुक्यात प्रचार दौरा केला. जत तालुका सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये मोठा आहे. विद्यमान खासदारांनी या तालुक्याकडे लक्षच दिलेले नाही. मंजूर कामाचे नारळ फोडण्याचे काम त्यांनी केले असल्याचा आरोप जत तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी प्रसंगी त्यांनी केला.


मिरज शहरात स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी प्रचार दौरा केला. यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, निंरजन आवटी, संदीप आवटी आदी सहभागी झाले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies