Type Here to Get Search Results !

DC vs SRH : हैदराबादचा दिल्लीवर जबरदस्त विजय : पॉइंट टेबलमध्ये मोठा फेरबदल



नरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्ल्सवर 67 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं होते. दिल्लीला या विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आले  नाहीत. 


दिल्लीचा डाव 19.1 ओव्हरमध्ये 199 धावांवर आटोपला. दिल्लीकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क याने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. तर हैदराबादकडून टी नटराजन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हैदराबादचा हा पाचवा विजय ठरला. तर दिल्लीला पाचव्या पराभवाचं तोंड पाहावं लागेल.


दिल्ली कॅपिट्ल्सकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क याने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या खेळीमुळे दिल्लीच्या विजयाचा आशा वाढल्या होत्या. मात्र विजयासाठी आवश्यक त्या रन रेटने इतर फलंदाजांना खेळता आलं नाही. जेक फ्रेझर-मॅकगर्क याव्यतिरिक्त दिल्लीसाठी कॅप्टन ऋषभ पंत याने 35 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह 44 धावा केल्या. 


अभिषेक पोरेल याने 22 चेंडूत 42 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाज निष्प्रभ ठरले. हैदराबादकडून नटराजनशिवाय नितीश रेड्डी आणि मयंक मार्कंडे या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.


हैदराबाद कडून ट्रेव्हिस हेड याच्या 89 आणि अभिषेक शर्मा याने 46 धावांची खेळी केली. हेड आणि शर्मा या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 131 धावांची विक्रमी भागीदारी केली. मात्र हे दोघे आऊट झाल्यांतर मिडल ऑर्डरला त्यांच्याच वेगाने धावा करता आल्या नाहीत. 


दिल्लीने हैदराबादला झटपट काही धक्के दिले. त्यामुळे हैदराबादच्या धावांचा वेग मंदावला. नितीश रेड्डी 37, हेन्रिक क्लासेन 15 आणि एडन मारक्रम 1 धाव करुन आऊट झाले. मात्र त्यानंतर शाहबाज अहमद याने अखेरीस मोठे फटके मारुन हैदराबादला 250 पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. शाहबादने 59 धावा केल्या. तर अब्दुल समदने 13 धावा जोडल्या. 


कॅप्टन पॅट कमिन्स 1 वन रन आऊट झाला. दिल्लीकडून कुलदीप यादव याने 4 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेलच्या खात्यात 1-1 विकेट गेली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies