काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची जाहीर सभा. सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधींची जाहीर सभा पार पडणार आहे. 12 वर्षानंतर राहुल गांधी सोलापूर मध्ये येत आहेत. राहुल गांधी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू. दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी सोलापुरात दाखल होणार. राहुल गांधी सोलापुरातून भाजपवर कशा पद्धतीची टीका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले.
उद्धव ठाकरे यांची आज हदगाव येथे जाहीर सभा पार पडणार आहे. हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ हदगावमध्ये सकाळी 11:30 वाजता जाहीर सभा होईल. महाविकास आघाडीचे ठाकरे सेनेचे नागेश पाटील आष्टीकर व महायुतीचे बाबुराव कोहळीकर यांच्या या ठिकाणी लढत होणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची जाहीर सभा आहे. सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधींची जाहीर सभा पार पडणार आहे. 12 वर्षानंतर राहुल गांधी सोलापूर मध्ये येत आहेत .
सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार व काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे आटपाडी तालुका प्रचार दौऱ्यावर येत असून ते आटपाडी व करगणी जिल्हा परिषद गटातील गावामध्ये जावून प्रचार करणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला आज वाचायला मिळतील.