Type Here to Get Search Results !

आधी रक्तदान, मग मतदान ; ‘या’ आमदारांच्या कृतीची होतेय सगळीकडे चर्चा ...

 


प्रहार जनशक्ती  पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आज सपत्निेक मतदानाचा हक्कय बजावला. त्यांनी रक्तनदान करून आज सकाळी मतदानाचा अधिकार बजावला. लोकसभा निवडणुकीच्या  मतदानातून क्रांती घडेल, असा विश्वास बच्चू् कडू यांनी व्यक्त  केला. बच्चू कडू म्हाणाले, लोकशाहीची हत्या् होऊ नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे. शेतमालाला योग्या भाव मिळावा, गरिबांना पक्की  घरे मिळावीत, विद्यार्थ्यांचे पेपर फुटू नयेते, योग्य  उमेदवारांना नोकरी मिळावी,  या आशेतून लोकांनी मतदान केले आहे.


गेल्यात वीस वर्षांपासून आम्ही. शेतकरी, शेतमजुरांच्या  प्रश्नांसाठी लढा देत आहोत. ही कष्टककरी सर्वसामान्यांलची लढाई आहे. यात आम्ही यशस्वीं होऊ, असे बच्चू  कडू म्हणाले.ही निवडणूक निश्चितच शेतकरी, शेतमजूर आम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत.


आजच्यात मतदानामुळे देशात क्रांती घडेल. जाती-धर्माच्या  नावावर नाही, तर शेतकरी, शेतमजुरांच्या  प्रश्नांवरची आगळीवेगळी निवडणूक ठरेल, असे बच्चूी कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी महायुतीचे घटक असूनही अमरावती लोकसभा मतदार संघातून प्रहार जनशक्तीा पक्षाची उमेदवारी दिनेश बुब यांना देत संघर्ष उभा केला. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies