Type Here to Get Search Results !

Vishal Patil: मी कोणताही नियम तोडला नाही ; कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा



मी कुठलाही नियम तोडला नाही. मला कोणताही लेखी आदेश आला नाही. वसंतदादा घराण्यामध्ये काँग्रेस आहे. कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा, आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस (Congress) पक्षासाठी दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी, असं वक्तव्य काँग्रेसचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी केलं आहे. 


विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. परंतु पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या वरिष्ठांना इशाराच दिला आहे. कारवाई करताना विचार करून करावी असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.


विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले, मी कुठलाही नियम तोडला नाही. मला कोणताही लेखी आदेश आला नाही. वसंतदादा घराण्यामध्ये काँग्रेस आहे. कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा, आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस पक्षासाठी दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी. 


सांगलीच्या तीन दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला. पाण्यासाठी गावकरी कर्नाटकमध्ये जात आहेत. भाजपवर लोकांची नाराजी आहे. मला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संजय पाटील (Sanjay Patil) यांच्यावर लोकांचा रोष आहे. संजय पाटील हे भाजपकडून उभे आहेत. म्हणून त्यांना मत पडतात. कोणाचे डिपॉजिट जप्त होईल असे मी म्हणणार नाही, असं म्हणत त्यांनी दोन्ही पाटलांवर निशाणा साधला.


तसेच कालच्या कार्यक्रमाला काय झाले माहीत नाही. कार्यकर्त्यांनी सय्यम ठेवावे. पण त्यांच्या भावना आहेत. त्या उमटल्या असतील आणि घोषणाबाजी झाली असेल. विश्वजित कदम यांनी पहिल्यापासून उमेदवारी मागितली होती. परंतु काँग्रेस पक्षावर अन्याय झाला हे दुर्देव आहे. पण पुढच्या काळात विश्वजीत कदम आमचे नेते असतील असं सूचक वक्तव्यदेखील विशाल पाटील यांनी यावेळी केलं.


(Edited By Sanika Waghmare)

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies