Type Here to Get Search Results !

असं नाही.. नीट रडायचं ! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल ; अजित पवार गटाच्या आमदाराला डिवचल....



मरावती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रहारचे बच्चू कडू आणि स्वाभिमानचे रवी राणा यांच्यातील संघर्ष ताजा असतानाच आता त्यामध्ये आणखी एका पक्षाची भर पडली असून, महायुतीतील मित्रपक्षानेच नवनीत राणा यांना इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये सर्व काही आलबेल नाही की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.


 महायुतीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहेत. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि महायुतीचे अनेक नेते यांची आज दिनांक २४ रोजी अमरावती येथे जाहीर संपन्न झाली. 


सभेसाठी उभारण्यात आलेल्या भल्यामोठ्या व्यासपीठावर एक डिजिटल फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, या डिजिटल फ्लेक्सवर आणि सभास्थळी कुठेही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि युतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला नव्हता. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नाराजी दर्शवली.


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सभास्थळी लावण्यात आलेला फ्लेक्स दिसत आहे. शिवाय व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "नवनीत राणाजी आपण महायुतीचा धर्म विसरला आहात. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल


अमोल मिटकरींनी  ट्विट केलेला व्हिडिओ रिट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अजित पवार गटाला डिवचलं आहे. शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांनी मिटकरींचं ट्विट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, "असं नाही.. नीट रडायचं ! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल." असं ट्विट करत जगताप यांनी अजित पवार गटाला डिवचण्याचं काम केल्याचं पाहायला मिळत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies