Type Here to Get Search Results !

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “या” नेत्याच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई



राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील साखर पोती साठा बँकेने  जप्त केला. शिवाय जप्तीची कारवाई केल्यानंतर शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला आहे. शिखर बँकेचे पैसे न भरल्याने काही दिवसापूर्वी बँकेने कारवाई सुरू केली होती. यावर पाटील यांनी स्टे घेतला होता. आज स्टे उठताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. 



ही कारवाई सुरू असताना अभिजित पाटील हे करमाळा येथे शरद पवार यांच्या सभेत होते. रोहित पवार यांनी भाषणात कारवाई सुरू झाल्याचे सांगताच पाटील तातडीने पंढरपूरकडे रवाना झाले. अभिजित पाटील यांनी पंढरपूरमध्ये आज  शरद पवार यांची संध्याकाळी सभा ठेवली आहे. शरद पवार आज (दि.26) मुक्कामाला पंढरपूरमध्ये असताना ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. 


धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेतून मैदानात उतरल्यानंतर अभिजीत पाटील यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मोहिते पाटील पक्षात आल्यामुळे मलाच आमदार झाल्यासारखं वाटू लागलयं, असंही अभिजीत पाटील यांनी म्हटलं होतं. दरम्यान अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना क्लीनचीट मिळाली असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांवर कारवाई सुरु असल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies