Type Here to Get Search Results !

सांगली : मविआचे उमेदवार चंद्रहार पाटीलविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल



माणदेश एक्सप्रेस न्युज/ सांगली : सांगली लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. विनापरवाना प्रचार पदयात्रा केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


उबाठा शिवसेनेचे उमेदवार पाटील यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी मिरज तालुक्यातील खटाव, बेडग या गावी लोकांच्या भेटी घेण्यासाठी पदयात्रा काढली. 


मात्र, या पदयात्रेसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. यामुळे निवडणूक आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार भरारी पथकातील प्रमुख सुरेश चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies