Type Here to Get Search Results !

आटपाडी : स्कुटीच्या डिक्कीतून दोन लाखाची रोकड लंपास ; भरदिवसा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी :  येथे आज (दिनांक २६ एप्रिल २०२४) दुपारच्या सुमारास स्कुटीच्या डिक्कीमधील दोन लाख १० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने, मोठी खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी (धांडोरमळा) येथील चांगदेव पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँके मार्केट यार्ड शाखेतून दोन लाख १० हजार रुपये रोख काढले होते. सदरची रक्कम त्यांनी त्यांच्या स्कुटीमध्ये डिक्कीमध्ये ठेवली होती. सदरची रक्कम  ते आपल्या पुतण्याला देण्यासाठी घराकडे निघाले होते. 


घराकडे जात असताना ते आबानगर चौक या ठिकाणी एका दुकानात थांबले होते. सदरचे पैसे घेवून जाण्यासाठी त्यांचा पुतण्या त्या ठिकाणी आला असता त्यांना स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले पैसे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. आटपाडी पोलीस ठाणे येथे धाव घेत अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्यादी नोंद केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने नागरिकांच्यात घबराट पसरली आहे.


यापूर्वी अशीच घटना घडली होती.

चांगदेव पाटील यांच्या स्कुटीच्या डिक्कीतील दोन लाख १० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज घडली असली तरी यापूर्वी देखील एक जेष्ठ नागरिक बँकेतून पैसे काढून घेवून सायकल वरून जात असताना अशाच प्रकारची चोरीची घटना घडली होती. सदरची घटना देखील अजून उजेडात आली नाही. तोपर्यंत चांगदेव पाटील यांच्या स्कुटीच्या डिक्कीतील रक्कम लंपास झाली. दोन्ही घटनेतील चोरीचे साम्य एकाच प्रकारचे असून सदर घटनेचा तपास करणे पोलिसांच्या पुढे आव्हान आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies