Type Here to Get Search Results !

बैल थेट मोबाईल रिपेरिंगच्या दुकानात घुसला ; घटनेचा थरारक VIDEO पाहून तुम्ही म्हणाल....



सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. यामध्ये बैल चक्क मोबाईल रिपेअरींगच्या दुकानात घुसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.


हा व्हिडिओ एका मोबाईल रिपेअरिंग दुकानाचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन लोक एका छोट्या दुकानात मोबाईल दुरुस्त करत आहेत, तर एक व्यक्ती काउंटरवर उभी आहे. काही काळ सर्व काही सुरळीत राहते, पण अचानक काहीतरी पाहून या लोकांना धक्का बसतो. आत बसलेले दोन्ही तरुण उभे राहतात आणि त्यांना काही समजायच्या आधीच एक मोठा बैल तिथे उडी मारतो.


 बैल सरळ काउंटरच्या आत उडी मारतो, यावेळी काउंटरच्या बाहेर उभा असलेला व्यक्ती थोडक्यात बचावतो, तर आत उपस्थित असलेले दोन तरुण कोपऱ्यात एकमेकांना चिकटून बसतात. बैल तेथे उपस्थित फोन आणि इतर वस्तू पूर्णपणे उध्वस्त करतो. बैलाच्या भीतीमुळे एक तरुण खुर्चीच्या साहाय्याने वर चढण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरा खुर्चीच्या मागे लपतो. बैल आत येताच तो शांत होतो आणि काउंटरमधून बाहेर कसे पडावे हे त्याला समजत नाही. 


बैलाचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies