Type Here to Get Search Results !

उत्तम जानकर यांचा भाजपवर गंभीर आरोप ; म्हणाले, मला तुरुंगात........



माणदेश एक्सप्रेस न्युज : सोलापूर : माळशिरसचे उत्तम जानकर यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले असून, जर महायुती मध्ये सामील झालो नाही तर, मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली असल्याचा जाहीर आरोप केल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


उत्तम जानकर म्हणाले, महायुतीत थांबलो नाही, तर जेलमध्ये टाकू अशी धमकी देण्यात आली आहे. असं राजकारण मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. पण, मला सरकारला सांगायचं आहे. ज्या दिवशी मला अटक केली जाईन, त्यादिवशी राज्यातील दोन कोटी धनगर समाज तुरुंगाला वेढा दिल्याशिवाय राहणार नाही. 


सोलापूर लोकसभेसाठी मी भाजपला तिकीट मागितलं होतं. पण, माझी फसवणूक करण्यात आली. या फसवणुकीचा हिशोब करण्यासाठी रणमैदानात उतरलो आहे, असं उत्तम जानकर यांनी सांगितलं.


यावेळी शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. "दिल्ली आणि झारखंडमधील मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकावर टीका केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यांना कारण नसताना तुरुंगात टाकण्यात आलं. विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी सत्ता घेता का? भाजप देशात हळूहळू हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे," असं शरद पवारांनी म्हटलं.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies