Type Here to Get Search Results !

जिममध्ये वॉर्म अप करताना व्यक्तीला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू,



वाराणसीमध्ये पियारी (चेतगंज) येथील रहिवासी 32 वर्षीय दीपक गुप्ता 10 वर्षांपासून जिममध्ये जात होता. नेहमीप्रमाणे मंगळवारीही तो सिद्धगिरी बागेत असलेल्या जिममध्ये पोहोचला. त्याने वेट ट्रेनिंगआधी वॉर्म-अप सुरू केले व अचानक तो जमिनीवर पडला.

    

वाराणसीमध्ये जिम करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दहा वर्षांपासून जिम करत असलेला हा तरुण जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर पडला आणि काही काळाने त्याचा मृत्यू झाला. याआधी त्याला ब्रेन हॅमरेज झाला होता, असे सांगण्यात येते. पियारी (चेतगंज) येथील रहिवासी 32 वर्षीय दीपक गुप्ता 10 वर्षांपासून जिममध्ये जात होता. 


नेहमीप्रमाणे मंगळवारीही तो सिद्धगिरी बागेत असलेल्या जिममध्ये पोहोचला. त्याने वेट ट्रेनिंगआधी वॉर्म-अप सुरू केले व अचानक तो जमिनीवर पडला आणि वेदनेने तळमळू लागला. तेथे उपस्थित असलेले इतर तरुण आणि प्रशिक्षक घाईघाईने त्याला घेऊन महमूरगंज येथील रुग्णालयात धावले. तेथे डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. जिम चालकाने याची माहिती पोलिसांना दिली.


 पोलिसांमार्फत कुटुंबीयांना माहिती मिळाली. मोठा भाऊ दिलीप गुप्ता याच्या म्हणण्यानुसार, दीपक त्याच्या तब्येतीची खूप काळजी घेत असे. जिममध्ये तो 3 तासांपेक्षा जास्त वेळ घालवायचा. गेल्या 10 वर्षांत त्याला ताप आला नव्हता. दीपकचे 9 वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्याला एक मुलगा आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies