Type Here to Get Search Results !

आटपाडी : लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात, हाकेवाडी येथे मतदान केंद्र सजावट ; दिव्यांग कर्मचारी मतदान केंद्र सांभाळणार




माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्याचे शहरांमध्ये लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली असून सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी नागरिकांची मतदान केंद्राकडे पाऊले ओळख आहे.



आटपाडी तालुक्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक साठी मतदान सकाळी  7.00 ते 6.00 ह्या वेळेत होणार आहे. या निवणुकीसाठी  134423 इतके मतदार मतदान करणार आहेत. त्यासाठी मतदान केंद्रावर 840 इतके कर्मचारी तर 140 पोलीस शिपाई नेमले असून झोनल अधिकारी 16 आहेत. तालुक्यात 70 मतदान केंद्रावर वेब काष्टींग होणार आहे.






आटपाडी शहरातील हाकेवाडी मतदान केंद्राची आकर्षक सजावट करण्यात आली होती. याठिकाणी मतदार केंद्र हे  दिव्यांग कर्मचारी सांभाळत आहेत. या ठिकाणी सकाळच्या सत्रात नागरिकांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. मतदार ही नेहमीप्रमाणे मतदान करण्यासाठी येत होते परंतु या ठिकाणी मतदार यादीतील नाव शोधून देण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्तेच नसल्याने मतदानाला विलंब होत होता.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies