Type Here to Get Search Results !

डॉन 3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी दिसणार मुख्य भूमिकेत

 


 शाहरुख खानच्या 'डॉन' या सुपरहिट चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची नुकतीच घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये रणवीर सिंग आता नव्या डॉनच्या भूमिकेत दिसणार असून, त्याच्या सोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे, या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने 'दैनिक जागरण'मध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, दिल्ली, दुबई आणि युरोपमधील काही सुंदर लोकेशन्सवर होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शाहरुख खानने 'डॉन'च्या पहिल्या दोन भागात डॉनची भूमिका साकारली होती. दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. रणवीर सिंग डॉन बनल्याची बातमी ऐकून त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचवेळी कियारा अडवाणीसोबतची त्याची जोडीही प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies