Type Here to Get Search Results !

मला शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मिळाली होती ;पण मी माझ्या सिद्धांतांना प्राधान्य दिलं सुपरस्टार पवन कल्याणचं वक्तव्य



नसेनाचे संस्थापक आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण सध्या चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तो आंध्रप्रदेशमध्ये प्रचार करत आहे. नुकत्याच एका रॅलीदरम्यान त्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा उल्लेख केला. यामुळे पवन कल्याणचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. “पैशांसाठी मी कधीच माझ्या मूल्यांशी तडजोड करत नाही”, असं तो म्हणाला. एका जाहिरातीसाठी शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मला मिळाली होती, मात्र जनहिताचा विचार करून मी ती नाकारली, असा खुलासा पवन कल्याणने रॅलीमध्ये केला.



पवन कल्याण या रॅलीदरम्यान म्हणाला की, 2000 मध्ये त्याला समजलं की एक सॉफ्ट ड्रिंक लोकांच्या आरोग्यासाठी ठीक नाही. या सॉफ्ट ड्रिंकमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे समजताच त्याची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला. “कोला ब्रँडने मला त्यांच्या सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात करण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र मी त्यात जराही रस दाखवला नाही. मला शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मिळाली होती. पण मी माझ्या सिद्धांतांना प्राधान्य दिलं. अशा पद्धतीने पैसे कमावण्यात मला अजिबात रस नाही”, असं तो पुढे म्हणाला.




पवन कल्याणचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठा चाहतावर्ग आहे. 2008 मध्ये त्याने राजकारणात प्रवेश केला. 2014 मध्ये त्याने जनसेना पार्टीची स्थापना केली. पवन कल्याण हा मेगास्टार चिरंजीवीचा लहान भाऊ आहे. भावाच्या पक्षासाठी चिरंजीवी यांनीसुद्धा जनतेला आवाहन केलं आहे. नुकताच त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते त्यांच्या छोट्या भावाला मत देण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. “माझा छोटा भाऊ लोकांच्या सेवेसाठी आपल्या पैशांचा वापर करत आहे. त्याच्यावर तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या”, असं ते म्हणाले. दुसरीकडे अभिनेता नानी यानेसुद्धा एक पोस्ट लिहित पवन कल्याणला समर्थन दर्शविलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies