Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील राजकीय एकीने विशाल पाटील फ्रंटफुटला तर संजयकाका...!



माणदेश एक्सप्रेस न्युज आटपाडी/प्रतिनिधी : सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आटपाडी तालुक्यातून पाठबळ मिळत नव्हते. सगळ्याच नेत्यांचा संजयकाका पाटील पाठबळ असल्याने, सुरुवातीच्या काळात विशाल पाटील बॅकफुटवर फेकले गेले होते. मात्र करगणी येथील राजकीय एकीने ते सध्या फ्रंटफुटला आले असून भाजपचे संजयकाका पाटील मात्र आता बॅकफुटवर गेले आहेत.


आटपाडी तालुका भाजप व शिंदे गटाचा बालेकिल्ला. या ठिकाणी काँग्रेस पश्चिम भागात तग धरून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट एका-एका गावात त्यांचे प्राबल्य आहे. सांगली लोकसभेसाठी भाजपकडून या ठिकाणी विद्यमान खासदार यांच्या बद्दल नाराजी असताना त्यांना तिकीट दिले. काँग्रेसचे विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून अर्ज ठेवला आहे.


राज्यामध्ये महायुतीचे सरकार असल्याने आटपाडी तालुक्यातून सगळ्या सत्तेतील नेत्यांनी संजयकाका पाटील यांना पाठींबा जाहीर केल्याने संजय पाटील यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघातून ८० हजारांचे लीड घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अपक्ष विशाल पाटील बॅकफुटवर गेले होते. मात्र जसेजसे प्रचारात रंग येवू लागला तसतसा भाजपचा जोर कमी होत गेला.


विशाल पाटील यांनी प्रचारासाठी आटपाडी तालुक्यात प्रचार बैठका घेत वातावरण गरम करायला सुरुवात केली. विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर प्रचारात केलेल्या आरोपावर संजयकाका विशाल पाटील यांना प्रत्युत्तर देवू शकले नाहीत. आटपाडी तालुक्यात संजयकाका पाटील यांच्यावर काही गावातील प्रचार सभा रद्द करण्याची वेळ आली. तसेच सोशल मिडीयामध्ये विशाल पाटील यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरु असून, जो भाजप २०१४ साली सोशल मिडियाच्या माध्यमातून सत्तेत आला, तोच सोशल मिडिया आता संजयकाका पाटील यांना जड जावू लागला आहे.  


करगणी येथे सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत करगणी पॅटर्न निर्माण करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यामागे आपली ताकत उभी केली असल्याने जे संजयकाका पाटील फ्रंटफुटला होते तेच आता बॅकफुटवर गेले असल्याने अपक्ष उमेदवार विशाल पाटील फ्रंटफुटला आले. यामुळे तालुक्यातील राजकारण बदलत चालले असल्याचे चित्र आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies