Type Here to Get Search Results !

रिक्षाचालकाचा भयानक यूटर्न... दुचाकीचा अपघात ;पहा थरारक व्हिडीओ

 




स्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक चिपळूणमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.


हा भीषण अपघात चिपळूणमध्ये झाला आहे. रिक्षा आणि दुचाकी यांच्यात हा भयानक अपघात झाला. दुचाकीस्वार दोघे मागून भरधाव येऊन त्यांनी ऑटोला धडक दिली. या व्हिडीओमध्ये पाहू शकता,रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. सर्वसामान्यपणे वर्दळ होती. या दरम्यान रिक्षा समोरच्या दिशेतून येत होती. पण रिक्षा चालकाने मागेपुढे फार गाड्या नसल्याने यु टर्न मारला. नेमकं त्याचवेळी भरधाव वेगात दुचाकी आली. ही दुचाकी जोरात रिक्षाला धडकली आणि दुचाकीवरील दोघेजण खाली पडले. अतिशय थरारक असा हा अपघात झाला.

पहा व्हिडीओ:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies