Type Here to Get Search Results !

तीन खान करणार एकत्र एका मुव्हीत काम?

 


बॉलिवूडचे तीन खान - आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे चेहरे आहेत. या तिघांच्याही चाहत्यांची इच्छा आहे की, ते एकत्र चित्रपटात काम करतील. आता खुद्द आमिर खानने या प्रकरणाबाबत मोठी माहिती शेअर केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत.



यादरम्यान त्याने शाहरुख आणि सलमानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. शाहरुख आणि सलमान खान यांची नुकतीच भेट झाल्याचे आमिर खानने सांगितले. आमिरने या दोघांना सांगितले होते की, "आम्ही तिघेही इतकी वर्षे एकाच इंडस्ट्रीत आहोत आणि करिअरच्या या टप्प्यावर आपण एकत्र चित्रपट केला नाही तर हे प्रेक्षकांसाठी खूप चुकीचे ठरेल. 


आमिर पुढे म्हणाला की, हे तिघेही एका कथेच्या शोधात आहेत. आमिरच्या या विधानाने प्रेक्षकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. या तिघांनीही चित्रपटात एकत्र काम केले तर ती खरोखरच मोठी गोष्ट असेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies