Type Here to Get Search Results !

टिकटॉकने केली अमेरिकन सरकारविरुद्ध केस दाखल...वाचा काय आहे प्रकरण

 



सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक आणि त्याची मूळ कंपनी ByteDance यांनी मंगळवारी यूएस फेडरल सरकारविरुद्ध खटला दाखल केला. यूएसमधील एका नव्या कायद्यानुसार, कंपनीला त्यांचे सोशल मीडिया ॲप विकण्यास भाग पाडले जाईल किंवा त्यांना युनायटेड स्टेट्समध्ये बंदीला सामोरे जावे लागेल. आता याच कायद्याला ByteDance ने न्यायालयात आव्हान दिले आहे. या कायद्यावर गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी स्वाक्षरी केली होती. या खटल्यामुळे यूएसमधील टिकटॉकच्या भविष्याबाबत दीर्घ कायदेशीर लढाई होऊ शकते.



लहान व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेल्या टिकटॉक या प्लॅटफॉर्मने अमेरिकन सरकारने मंजूर केलेला हा कायदा असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. या कायद्यात अशी तरतूद आहे की, टिकटॉकची मूळ कंपनी ByteDance ला नऊ महिन्यांच्या आत आपला प्लॅटफॉर्म विकावा लागेल. जात त्यांचे विक्रीसाठी आधीच कोणते प्रयत्न सुरू असल्यास, कंपनीला करार पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तीन महिने मिळतील. परंतु ByteDance ने म्हटले आहे की, त्यांची टिकटॉक विकण्याची कोणतीही योजना नाही, मात्र विक्री करण्याचा विचार असला तरी त्याला चीन सरकारची मान्यता घ्यावी लागेल. प्लॅटफॉर्मच्या सक्तीच्या विक्रीला चीनने यापूर्वी विरोध केला आहेपहा पोस्ट- 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies