Type Here to Get Search Results !

सायबेरियन जमातीच्या पाळीव कुत्र्याने खेळत असलेल्या मुलाला घेतला चावा

     



चेन्नईतील वेलाचेरी येथे गार्ड क्वार्टरमध्ये ही घटना घडली. या घटनेत उन्हाळी सुट्टी साजरी करण्यासाठी मावशीच्या घरी आलेल्या ९ वर्षाच्या मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. काल मंगळवारी संध्याकाळी खेळत असताना सायबेरियनजमातीच्या पाळीव कुत्र्याने खेळत असलेल्या मुलाला चावा घेतला. यामध्ये मुलाच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेनंतर मुलाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जखमी मुलावर तेथे उपचार करण्यात आले. 


या संदर्भात मुलाच्या पालकांनी पारंगीमलाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला असून त्याची कसून चौकशी सुरू आहेदोनच दिवसांपूर्वी नुंगमबक्कम येथील उद्यानात एका मुलीला पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता, आता पुन्हा तोच प्रकार घडला आहे. त्याशिवाय, नोएडा मध्ये रहिवाशी इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. लिफ्ट एका मजल्यावर काही सेकंदांसाठी उघडते, लिफ्ट उघडताच कुत्र्याने मुलीवर उडी मारली आणि तिला चावा घेतला. त्यानंतर ती वेदनेने कळवळत हाताच्या दंडाकडे बघत होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies