राष्ट्रवादीचे म्हसवड शहर अध्यक्ष युवराज सूर्यवंशीनां जीवे मारण्याची धमकी


राष्ट्रवादीचे म्हसवड शहर अध्यक्ष युवराज सूर्यवंशीनां जीवे मारण्याची धमकी
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : म्हसवड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. स्नेहल सूर्यवंशी व त्यांचे पती माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली असून युवराज सूर्यवंशी यांनी म्हसवड पोलिसात तक्रार दिली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी, युवराज सूर्यवंशी हे म्हसवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आहेत. शिवाय ते माजी नगरसेवक आहेत. त्यांची पत्नी सौ. स्नेहल सूर्यवंशी यांनी पहिल्यांदाच नगरपालिका निवडणूक लढविली व निवडून आल्या व पालिकेच्या उपनगराध्यक्षाही झाल्या. 
सोमवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.५३ वाजता +४४ २०३०५१०९८६ क्रमांकावरून त्यांना फोन आला. व फोनवरून शिवीगाळ, दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पक्षाच्या कामासाठी, सार्वजनिक कामानिमित्त तसेच व्यवसायानिमित्त रात्री-अपरात्री बाहेर जावे लागते. त्यामुळे फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीकडून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला असून सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured