कोरोना चाचणीसाठीची मिरज येथील लॅब दोन दिवसात सुरु होणार ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


कोरोना चाचणीसाठीची मिरज येथील लॅब दोन दिवसात सुरु होणार ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे  सुरु करण्यात येणाऱ्या लॅबसाठी सर्व मशनरी उपलब्ध झाली असून आज टेस्ट घेण्यात येणार आहे. साधारणात: येत्या दोन दिवसात सदर लॅब पुर्ण क्षमतेने कार्यरत होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाबाधित 25 रुग्ण असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.. या सर्वांवर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये उपचार सुरु आहेत. रुग्णसंख्येत जिल्ह्यात कोणतीही वाढ झाली नाही. पाच रुग्णांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती देऊन सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 1406 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 83  व्यक्ती आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 55 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 25 जणांचे स्वॅब टेस्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यापैकी एक व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील आहे. इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये 45 व्यक्ती असून त्यामध्ये मिरज येथे 18 व इस्लामपूर येथे 27 आहेत. 242 व्यक्तींचा 14 दिवसाचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे.  सद्यस्थितीत 1030 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. होम क्वॉरंटाईमध्ये असलेल्यांना पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा सातत्याने भेटी देऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. यापैकी कोणालाही लक्षणे दिसून आलेली नाहीत. इस्लामपूरमधील कोरोना बाधित कुटुंबाच्या जे नजिकच्या संपर्कात नव्हते त्यांनाही तपासणीकरुन होम क्वॉरंटाईमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचीही आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येत आहे. कोणालाही लक्षणे अढळून आली नसूल सर्वांची प्रकृती स्वस्थ आहे. सांगितले. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured