संचार बंदीच्या काळात बुलेट वरून फिरणे पडले महागात ; निंबवडेच्या एका विरोधात आटपाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

संचार बंदीच्या काळात बुलेट वरून फिरणे पडले महागात ; निंबवडेच्या एका विरोधात आटपाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल


संचार बंदीच्या काळात बुलेट वरून फिरणे पडले महागात
निंबवडेच्या एका विरोधात आटपाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असताना व संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत असताना निंबवडे ता. आटपाडी, जि. सांगली येथे बुलेट घेऊन फिरणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. 
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, निंबवडे येथील इंद्रजीत यशवंत खांडेकर वय वर्षे 36 रा. निंबवडे मूळ रा. पीएनजी कॉलनी मानखुर्द मुंबई हा दिनांक 23 रोजी निंबवडे गावच्या हद्दीत एसटी स्टँड चौकात बुलेट गाडी क्र. एम.एच.४६- ए.सी. २१५१ वरून फिरत असल्याने त्याच्या विरोधात भादंविस कलम 188, 34 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अ प्रमाणे पोना दिग्विजय कराळे यांनी आटपाडी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना रणदिवे करीत आहेत.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments