निंबवड्यात मदतीचा ओघ सुरूच, वाढदिवसानिमित्त शिधा वाटप !

निंबवड्यात मदतीचा ओघ सुरूच, वाढदिवसानिमित्त शिधा वाटप !


निंबवड्यात मदतीचा ओघ सुरूच, वाढदिवसानिमित्त शिधा वाटप !
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे ता. आटपाडी, जि. सांगली येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोर गरिबांची चूल पेटती राहावी यासाठी विशेष प्रयत्न होत असताना दिसत असून आज सलग तिसऱ्या दिवशी माजी उपसरपंच बाळासाहेब मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले.
मागच्या दोन दिवसांपासून सलगपणे लोक पुढे येत असून याची सुरवात नामदेवशेठ मोटे यांच्यापासून झाल्यानंतर काल डी.टी. मोटे यांच्या वतीने किराणा मालाचे किट गावात वाटण्यात आले होते. आज आपल्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब मोटे यांनी किट वाटप करून गरजू व्यक्तींना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब मोटे, शिक्षक जयंत देठे, पोलिस पाटील प्रवीण मंडले, आदर्श शिक्षक अशोक मोटे यांची विशेष उपस्थिती होती.  आज वाढदिवसा निमित्त केक न कापता गरजू व्यक्तींची चूल पेटावी यासाठी किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले, कोरोना च्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करण्याची भूमिका आहे.
बाळासाहेब मोटे 
माजी उपसरपंच, निंबवडे


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments