आटपाडी दि. २१ व २८ तर करगणीतील दि. १९ व २६ रोजींचे जनावरांचे आठवडी बाजार बंद ; कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निणर्य 


आटपाडी व करगणीतील जनावरांचा आठवडीबाजार बंद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कोरोन विषाणूचा संसर्ग रोखण्याकरता आटपाडी तालुक्यातील करगणी येथे डी. १९ व २६ रोजी तर व आटपाडी येथे डी. २१ व २८ रोजी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार बंद राहणार आहे.
आटपाडी तालुक्यांमध्ये शेळ्या-मेंढ्यांचा व जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात आटपाडी येथे भरतो. तर उपबाजार आवार करगणी येथे शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरतो. मुख्य बाजार आटपाडी येथे २१  व २८ रोजी भरणारा व १९ व २६ रोजी करगणी येथे भरणारा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशाने बंद ठेवण्यात आलेला आहे. तरी बाजार बंद असल्याची माहिती व्यापारी, दलाल, शेतकरी, घ्यावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड  व सचिव शशिकांत जाधव यांनी केले आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured