माल वाहतूक वाहनांमध्ये प्रवासी आढळल्यास कायदेशीर कारवाई करा ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 

माल वाहतूक वाहनांमध्ये प्रवासी आढळल्यास कायदेशीर कारवाई करा ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 


माल वाहतूक वाहनांमध्ये प्रवासी आढळल्यास कायदेशीर कारवाई करा ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सांगली जिल्ह्याची स्थलसीमा हद्द प्रवासी व माल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून काही टँकर अथवा कंटेनर मधून प्रवासी व्यक्तींची वाहतूक होत असल्याची माहिती पुढे येत आहे. या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्या व जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी व अशा प्रकारे कोणतीही वाहतूक आढळून आल्यास संबंधितावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश पोलीस प्रशासन व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांना दिले आहेत.
माल वाहतूक मधून प्रवासी आढळून आल्यास त्यांची सर्व माहिती संबंधित तहसिलदार यांना तात्काळ देण्यात यावी. अशा प्रवाशांची सर्व सोय तहसिल कार्यालयामार्फत केली जाईल, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments