म्हसवड शहरातील लोकांच्या आरोग्यासाठी सलग पाच दिवस जनता कर्फ्यू राबवण्याचा एकमुखी निर्णय

म्हसवड शहरातील लोकांच्या आरोग्यासाठी सलग पाच दिवस जनता कर्फ्यू राबवण्याचा एकमुखी निर्णय


म्हसवड शहरातील लोकांच्या आरोग्यासाठी सलग पाच दिवस जनता कर्फ्यू राबवण्याचा एकमुखी निर्णय
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड नगरपालिका हद्दीमध्ये होम क्वारंटाइनचे शिक्के असणारे काही रुग्ण म्हसवड शहरात व  बाजारपेठेमध्ये फिरताना दिसले, तर काहीजण फळे व भाजी विकत असल्याचेही दिसून आले. ही बाब म्हसवड मधिल  नागरिकांनी म्हसवड पोलीस स्टेशनच्या  लक्षात आणून दिली म्हसवड पोलीसांनी त्वरीत संबंधित व्यक्तीला होम क्वारंटाइन  केले. तसेच  मुंबई व इतर शहरातून आलेले नागरिक शहरात गर्दी करीत आहेत. यासाठी म्हसवड नागरीकानी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेऊन  म्हसवड शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये नगरपालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक व काही मान्यवर नागरिकांनी बैठक घेतली. यावेळी म्हसवड शहरातील लोकांच्या आरोग्यासाठी सलग पाच दिवस पूर्णपणे जनता कर्फ्यू राबवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक, पत्रकार व विविध पक्षांचे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते. शहरातील फक्त मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय यावेळी  सर्वानुमते घेण्यात आला. संचार बंदी असताना भाजी मंडई मुळे ठिक-ठिकाणी गर्दी होत होती.  नगरपालिका प्रशासनाने सांगुन सुद्धा याबाबत नागरिक सतर्कता पाळत नव्हते. त्यामुळे सर्व किराणा दुकानदार, भाजी विक्रेत्यांना विनंती करून पाच दिवस पूर्णपणे जनता कर्फ्यू राबवण्यासाठी मदत करण्याची आवाहन करण्यात आले. 
यामुळे आज सकाळपासून म्हसवड शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. या कार्याबद्दल म्हसवड परिसरातील लोकांनी संबंधित जागृत नागरिकांना धन्यवाद दिले आहेत. म्हसवडचे ए.पी.आय. गणेश वाघमोडे, नगराध्यक्ष तुषार विरकर, नगरसेवक गणेश रसाळ, आरपीआयचे किशोर सोनवणे, राष्ट्रवादीचे युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, माजी नगराध्यक्ष विजय धट,  अकिल काझी, अंगुली बनसोडे यांनी शहरातील नागरिकांना पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. यास नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments