Type Here to Get Search Results !

कोरोनामुक्त 22 व्यक्तींना डिस्चार्ज तर 72 व्यक्ती इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये :  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


कोरोनामुक्त 22 व्यक्तींना डिस्चार्ज तर 72 व्यक्ती इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये :  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आलेले, सस्पेक्टस व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अशा आतापर्यंत 1516 व्यक्ती आहेत. यापैकी 232 व्यक्ती आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 189 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. 
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 26 व्यक्तींना कोरोणाची लागण झाली होती. यामधील निगेटिव्ह अहवाल आलेल्यांपैकी 22 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . कोरोणाबाधित  दोन व्यक्तींसह अन्य दोन व्यक्ती मिरज येथे आयसोलेशन  कक्षात उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.  इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये 72 व्यक्ती (मिरज येथे 36, इस्लामपूर येथे 26 व शासकीय तंत्रनिकेतन 10) असून होम क्वॉरंटाईन असलेल्या 1212 व्यक्तींपैकी 646 व्यक्तींचा 14 दिवसाचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे.  सद्यस्थितीत 566 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies