प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बांधकाम साहित्य विक्रीचा “रात्रीस खेळ चाले” ; माळशिरस तालुक्यातील येळीव येथील दुकानदाराचा प्रताप ; प्रशासन कारवाई करणार का?  नागरिकांमध्ये चर्चा


प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बांधकाम साहित्य विक्रीचा “रात्रीस खेळ चाले”
माळशिरस तालुक्यातील येळीव येथील दुकानदाराचा प्रताप ; प्रशासन कारवाई करणार का?  नागरिकांमध्ये चर्चा
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी सुरू आहे. या कालावधीत नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खेरीज सर्व दुकाने व्यवसाय बंद ठेवण्यासाठी प्रशासनाने परिपत्रक जाहीर केले आहे. बांधकाम व्यवसायात वरही मोठा परिणाम दिसत असून. बांधकाम व्यवसाय यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र या आदेशांना केराची टोपली दाखवत प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत येळीव (ता.माळशिरस )येथील बांधकाम मटेरियल विकणाऱ्या दुकानदारांने रात्री साहित्य विक्रीचा धडाका सुरू केला आहे. अशा दुकानदारावर प्रशासकीय अधिकारी कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांतून पुढे येत आहे.
संचारबंदी काळात अनेक व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र लोकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने या गोष्टी कटाक्षाने पाळण्यासाठी परिपत्रकाद्वारे नियमावली दिली. यामध्ये बांधकाम व्यवसायाला पूर्णविराम दिला आहे. मात्र या परिपत्रकाला धाब्यावर बसवून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत बांधकाम मटेरियल सप्लायर दुकानदाराने आपला व्यवसाय रात्री सुरू ठेवला आहे. पुणे-पंढरपूर रस्त्यालगत येळीव हद्दीत असणाऱ्या या दुकानात सिमेंट खिडकी, दरवाजे, पोल आदी वस्तू तयार करून विक्री केली जाते. ग्राम समितीने अशा व्यवसायांना बंद ठेवण्यासाठी सूचना केल्या होत्या मात्र या दुकानदाराने रात्रीच्या वेळी मालाचे देवाण-घेवाण सुरू ठेवली आहे. यामुळे प्रशासकीय नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. इतर व्यवसायिकांनी कडकडीत बंद पाळला असताना अशा दुकानदाराच्या विक्री पद्धतीवर प्रशासन कारवाई करणार का?  ग्रामसमिती याबाबत काय निर्णय घेणार? अशा अनेक गोष्टी बाबत सध्या लोकांमधून चर्चा सुरू आहे. बांधकाम साहित्याबाबत कोणतेही दुकान सुरू ठेवण्यासाठी आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही.याबाबत आम्ही चौकशी करून दुकानदाराला कायदेशीर नोटीस देऊन दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.


बाळासाहेब वाघमोडे. सरपंच येळीवकोरोना विरुद्ध लढ्यात सर्वजण सहभागी झाले आहेत. अनेक व्यवसायांचे नुकसान होत आहे. मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच जीवनावश्यहक वस्तूंची दुकाने उघडली जात असताना एकीकडे सर्वसामान्य जनतेला नियमांसाठी वेठीस धरले जात आहे. मग नियमबाह्य सुरू असलेल्या दुकानावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करणे गरजेचे आहे. 
सुरेश टेळे तालुका अध्यक्ष मनसे


 


दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured