मागासवर्गीय १५ टक्के निधीतुन  अनुसुचित जाती व जमातीच्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा : राजेंद्र खरात यांचे प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी 


मागासवर्गीय १५ टक्के निधीतुन  अनुसुचित जाती व जमातीच्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा : राजेंद्र खरात यांचे प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : मागासवर्गीय १५ टक्के निधीतुन अनुसुचित जाती व जमातीच्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा अशी मागणीचे निवेदन आटपाडी तालुका आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केली असून निवेदनाच्या प्रति सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, सभापती प्रमोद शेंडगे, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आटपाडीचे गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांना दिलेल्या आहेत. 


हे ही वाचा :- विटा शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना थेट घरपोहच अनुदान ; कोरोना संकटात विटा नगरपरिषदेचा महत्त्वपूर्ण उपक्रम


कोरोना या संसर्गजन्य विषाणु च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेले असून संचारबंदी लागू आहे. त्यामुळे अनु.जाती जमाती नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच १५ टक्के मागासवर्गीय निधी आटपाडी तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीनी अद्याप खर्च केलेला नाही. त्यामुळे सदरचा निधी हा अनु.जाती जमाती मधील लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी खर्च करावा. त्यामुळे मागासवर्गीय लोकांची उपासमार थांबणार आहे. तसेच आपल्या शेजारील माळशिरस पंचायत समितीने तसा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतिचा असणरा १५ टक्के मागासवर्गीय निधी हा अनु.जाती.जमाती मधील नागिरकांना वैयक्तिक स्वरुपात मिळावा व त्यांना जीवनाश्यक वस्तूचा पुरवठा करण्यात यावा.Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured