अजनाळेकरांचा सलग दुसऱ्या दिवशी जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद


अजनाळेकरांचा सलग दुसऱ्या दिवशी जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे :  कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी आजनाळेकरांनी सलग दुसऱ्या दिवशी जनता कर्फ्यू ला १०० टक्के प्रतिसाद दिला. अजनाळे गावात दि. २६ ते २८ एप्रिल पर्यंत स्वयंघोषित जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अजनाळे गावचे सरपंच अर्जुन कोळवले यांनी गावातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, तोंडाला मास्कचा वापर करा, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवा, असे आवाहन केले आहे.
अजनाळे गावातील शेतकऱ्यांनी सर्व कामे बंद ठेवून आपल्या स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी आपले व्यवसाय बंद ठेवून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला आहे. सांगोला तालुक्यांमध्ये  कोरोना व्हायरसचा शिरकाव अधिक वाढू नये म्हणून शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.


हे ही वाचा :- डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा कोलकत्ता येथून सांगोला तालुक्यातील नागरिकांशी फोनवरून मनमोकळा संवाद


सांगोला तालुक्यामधील घेरडी गावमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आज दुसऱ्या दिवशी नागरिकांनी याला १००% प्रतिसाद दिला आहे. गावातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प ठेवले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकाने स्वयंपूर्ण तिने सलग तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याला अजनाळेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र गावामध्ये दिसून आले आहे. गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने व स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured