Type Here to Get Search Results !

माळशिरस येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न 


माळशिरस येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस येथील तलाठी कॉलनी, केंगार वस्ती येथे आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. या शिबिराचे उदघाटन बबन   केमकर (आप्पा) यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी आरोग्य विभागातील डॉ. दत्तात्रय वाघमोडे, शोभा वाघमोडे तसेच नगरपंचायतचे ध्रुवकुमार सोनवणे, निलेश कस्तुरे व नाना गोरे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. थर्मल स्कॅनिंग 
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार  करण्यात आला. या शिबिरात 259 जणांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. आलेल्या प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घरीच राहून कोरोनाशी   देत असलेल्या लढ्या बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुलाबपुष्प देण्यात आले. शिबिरासाठ रवींद्र पवार (ग्रामसेवक) यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली. 


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम!
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा ! आभार गीत



या वेळी बाळासाहेब वाघमोडे, शिवाजी वाघमोडे, शिवाजी शिंदे, श्री. घुले, प्रा.ढाले, बाळासाहेब केंगार, श्री. जवंजाळ, डॉ. बाळासाहेब चंदनशिवे, चांगदेव (मेजर) शिंदे, संभाजी काळे, नागनाथ खताळ, श्री. वझे काका उपस्थित होते. शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सचिन केंगार, भाऊसाहेब चंदनशिवे, नवनाथ शिंदे, बाजी सोनवणे, निनाद ढाले, भोलानाथ रॉय, निळकंठ वाघमोडे, रितेश म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले. यावेळी  वॉर्ड क्र.१३ मध्ये म्हस्कोबा मंदिर(४०३), जाधव वस्ती (१७४), पिसेवस्ती (२२७) व तलाठी कॉलनी (२५९) या ४ ठिकाणी शिबिराचे आयोजन करून १००% लोकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले आहे. 


वार्ड क्र. १३ मध्ये गरजू लोकांना अन्नधान्य वाटप, निर्जंतुकीकरण, थर्मल स्कॅनिंग करून आरोग्य तपासणी करण्यात आली असून आवश्यक ती सर्व उपयोजना करत असून पुढील काळासाठी आवश्यक ती खबरदारी नक्की घेण्यात येईल.
 नुतन सोमनाथ वाघमोडे 
नगरसेविका,नगरपंचायत, माळशिरस


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies