श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षकांचे संचारबंदीत पोलिसांना सहकार्य 

श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षकांचे संचारबंदीत पोलिसांना सहकार्य 


श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षकांचे संचारबंदीत पोलिसांना सहकार्य 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : कोरोना च्या विरोधात अखंड देश लढा देत आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्याने  प्रत्येकाकडे असणारा विभाग अत्यंत निकराने लढवीत आहे. मंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक घरी थांबून शासनाच्या आदेशाचे पालन करत आहेत. अशातच श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलचे  शिक्षक डी.के. भोसले, सौ. बी.एस. विभूते, टी.ए.जरे, गुरव एन.एम. आर.एस. क्षीरसागर, सौ. आर.सी.सागर या शिक्षक बंधूनी सुट्टी जाहीर केल्यापासून आटपाडी पोलिसांना बंदोबस्तामध्ये कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता राष्ट्राची सेवा करत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य शिक्षकी पेशा साठी अभिमानाची बाब ठरत आहे. वाहतूक सुरक्षा दलाचे शिक्षक रस्त्यावर उभे राहून जनजागृती करून पोलिसांना मदत करीत आहे. गेल्या महिन्यापासून आटपाडी पोलिसांबरोबर आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत या संचार बंदीच्या काळात कुटुंबाची काळजी घेत श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षकांचे योगदान संचारबंदीच्या काळात मोलाचे ठरत आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments