माळशिरस नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांचेकडून जीवनावश्यक वस्तू बरोबर व मुक्या जनावरांना पशुखाद्याचे वाटप


माळशिरस नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांचेकडून जीवनावश्यक वस्तू बरोबर व मुक्या जनावरांना पशुखाद्याचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष व वार्ड क्रमांक 10 चे विद्यमान नगरसेवक आप्पासाहेब देशमुख यांच्यावतीने वार्डातील 325 गोरगरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि सर्वसामान्य लोकांच्या पशुधन चाऱ्याची असणारी अडचण दूर करण्याकरता पेंड व भुशाचे वाटप करण्यात आले. श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन व माळशिरसचे ज्येष्ठ नेते नगरसेवक अॅड मिलिंद कुलकर्णी, माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ विश्वनाथ वडजे, पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे  यांच्याहस्ते वाटप करण्यात आली. 
यावेळी आयोजक आप्पासाहेब देशमुख, माळशिरसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शेळके, माळशिरसचे युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे संचालक रावसाहेब देशमुख, सहकार महर्षी कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र सिद, पत्रकार गहिनीनाथ वाघंबरे, नगरसेवक अशोक  वाघमोडे, कचरेवाडीचे नेते दादासाहेब जानकर, सलीम धनाजी देवकर, निलेश घाडगे, बाबा माने, ज्ञानेश्वर साळुंखे, कचरेवाडीचे सलीम शेख, तुकाराम गायकवाड, विक्रम वगरे, गणेश कुलकर्णी, श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गुजरे, श्री. उंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.  तर पशुधन असणाऱ्या लोकांचीही ही यादी काढून सदर लोकांच्या घरपोच भुसा व पेंड पोहोच केली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी सोशल डिस्टेंगसिंगचा नियम पाळून संचारबंदीचे ही  उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घेतलेली होती. आप्पासाहेब देशमुख यांनी प्रथमच माळशिरस शहरामध्ये हे पशुधन वाचवण्यासाठी अडचणीत असणाऱ्या लोकांच्या काळामध्ये मुक्या प्राण्यांनाही ही दिलासा दिलेला असल्याने त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थितांमध्ये हे कौतुक केले जात आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured