Type Here to Get Search Results !

देवापूर येथील दांपत्य देत आहे जळगाव जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा


देवापूर येथील दांपत्य देत आहे जळगाव जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा
माणदेश एक्सप्रेस न्युज
देवापूर/डॉ. सागर सावंत : देवापूर ता. माण, जि. सातारा येथील कै. तात्यासाहेब श्रीपतराव पोळ उर्फ आप्पा हे देवापूर पंचक्रोशीत त्यांचा परखड स्वभाव, पुरोगामी विचारसरणी, सामाजिक न्याय व आधुनिकता या तत्वामुळे तसेच जुन्या पिढीतील यशस्वी राजकारणामुळे सर्वज्ञात आहेत. त्यांचेच सुपुत्र साहेबराव पोळ त्यांच्याच वडिलांचा  वारसा लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतपेढी म्हसवड या बँकेच्या चेअरमन या नात्याने कार्यरत राहून तळागाळातील लोकांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. तसेच श्री पोळ यांच्या पत्नी सौ.ललिता पोळ माणदेशी महिला सहकारी बॅंक, म्हसवड या बँकेच्या उपाध्यक्ष या नात्याने माणदेशातील महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण, महिलांचे हक्क व त्याचे संरक्षण व महिलांचे अर्थकारण हे विषय हाती घेऊन तळागाळातील सर्व स्त्रियांच्या उन्नतीस हातभार लावत आहेत.
साहेबराव पोळ यांचे चिरंजीव धनंजय पोळ हे जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ येथे कृषि अधिकारी या पदावर शासन सेवेत काम करत आहेत तसेच त्यांची सून सौ. रुपाली पोळ ह्या भुसावळ येथेच बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. दिनांक   २२/०३/२०२० रोजी कोव्हीड १९ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होऊ नये व या जागतिक संकटास सामोरे जाण्याचा पहिला प्रयत्न म्हणून पंतप्रधान यांच्या विनंतीवरून जनतेने आदर्श असा जनता कर्फ्यू राबविला व त्यानंतर दिनांक १४/०४/२०२० पर्यंत २१ दिवसासाठी  संपूर्ण देशात लॉकडाऊन ची अंमलबजावणी सुरु झाली व सर्व देश आपापल्या घरात बंद झाला. परंतु या कालावधीत कुणीही सुरक्षित जागी जाण्याचा प्रयत्न करेल पण नोकरीच्या निमित्ताने का होईना श्री पोळ व सौ. पोळ यांनी कोठेहे इतरत्र न जाता देशावर ओढवलेल्या या संकटात देशाबरोबर उभे राहायचे ठरवून कामाच्या ठिकाणीच राहून लोकांची सेवा करण्याचे ठरवले व कामाला सुरुवात केली.
श्री पोळ कृषी अधिकारी म्हणून काम करताना शासनाच्या सूचनेनुसार शासनाचा कृषि विभाग व शेतकरी यांच्यात समन्वय राखण्याचे काम सुरु केले. दररोज शेकडो शेतकऱ्यांशी संपर्क येत असतानाही योग्य ती खबरदारी घेऊन शेतकरी उत्पादक ते ग्राहक याची साखळी बंधने, शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत तसेच थेट ग्राहकांपर्यंत पोहचवणे, मालवाहतूक, उत्पादन व विक्री साठी मदत करणे, कृषी विषयक विविध दुकाने सुरु ठेवणे, शेतकरी व यंत्रसामुग्रीस इंधन परवाने देणे यासारखी विविध कामे समन्वयक अधिकारी या नात्याने संसर्गाची पर्वा न करता करून शेतकऱ्यांचे हजारो  प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीतही मार्गदर्शक ठरत आहेत.
तसेच सौ. पोळ दररोज प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, जन धन योजना, शेतकरी कर्जमाफीची योजना तसेच दररोजचे सर्व व्यवहार हे शेतकरी, मजूर, महिला, निवृत्तीवेतन धारक अशा बँकेच्या शेकडो ग्राहकांशी आपुलकीने संवाद साधून प्रत्येक ग्राहकाचे हित लक्षात घेता मार्गदर्शन करीत आहेत व योग्य ती खबरदारी घेऊन शेकडो लोकांना विविध प्रकारच्या वित्तीय सेवा एक जबाबदार अधिकारी या नात्याने संसर्गाची पर्वा न करता देत आहेत. 
फक्त नोकरीच नव्हे, जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून पोळ दांपत्य प्रवास करणाऱ्या गरीब मजूर, वाटसरू तसेच त्यांची लहान मुले, महिला व वृद्ध यांना कपडे, जेवण तसेच आवश्यक एवढी आर्थिक मदत करत आहेत व सेवाभावी संस्थामार्फत त्या गरजू लोकांच्या निवाऱ्याची सोय करीत आहेत. त्यांनी केलेली विचारपूस व सुश्रुषा बघून हे दांम्पत्य एकटे पडलेल्या लोकांना त्यांच्या घरातीलीच व्यक्ती वाटतात. त्यांच्या या सहकार्याचा व सेवाभावनेच्या कार्यामुळे त्यांनी खानदेशात हि माणदेशाची मान उंचावली आहे. जीवाची परवा न करता हे दाम्पत्य दररोज जनसेवा करीत आहेत त्यांच्या व पोळ कुटुंबियांच्या आजपर्यंतच्या सेवेस दै.माणदेश एक्सप्रेस चा मनाचा मुजरा.......!


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies