डॉ. आंबेडकर संस्थेकडून गरजू  लोकांसाठी कम्युनिटी किचन सुरु  गरजू लोकांना दिले जाते दररोज दोन वेळचे जेवण 

डॉ. आंबेडकर संस्थेकडून गरजू  लोकांसाठी कम्युनिटी किचन सुरु  गरजू लोकांना दिले जाते दररोज दोन वेळचे जेवण 


डॉ. आंबेडकर संस्थेकडून गरजू  लोकांसाठी कम्युनिटी किचन सुरु ;गरजू लोकांना दिले जाते दररोज दोन वेळचे जेवण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला: डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांच्या वतीने डोंगरगाव ता. सांगोला येथे समाजातील निराधार, अपंग,वृद्ध लोकांसाठी कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोकळे यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा नंतर २४ मार्च पासून देशभर संचार बंदी लागू करण्यात आली. संचार बंदी असल्याने सर्वच घरात बसून आहेत. याचा लोकांच्या जीवनमानावर खूप मोठा परिणाम झाला आहे. रोजगार आणि इतर कोणतेही आर्थिक उत्पन्नाचे साधन नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील वृद्ध, अपंग, निराधार, एकल महिला, भूमिहीन व गरीब शेतकरी यांना आपल्या कुटुंबाचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. शासनाच्या पातळीवर जरी मदत जाहीर झाली असली तरी ती अद्यापलोकां पर्यंत पोहोचली नसल्याने या काळात समाजातील आर्थिक आणि समाजिक दृष्ट्या मागास लोकांना मदत करणे गरजेचे आहे. समाजात अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कित्येक लोकांच्या हाताला काम नाही, कोणते आर्थिक उत्पन्न नाही अशा परस्थितीत जगणे कठीण झाले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेने डोंगरगाव ता, सांगोला या ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले आहे. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून डोंगरगाव व सोनंद येथील 50 कुटुंबाना दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण संस्थेच्या कार्यकर्त्याच्या वतीने पुरवण्यात येत आहे. येणाऱ्या काळात अन्य काही गावातून कम्युनिटी किचन सुरु करण्याचा संस्थेचा मानस आहे. 
महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती व संस्था या उपक्रमास आर्थिक मदत करत असून लवकरच याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. या कम्युनिटी किचन च्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना दोन वेळचे अन्न मिळत असल्याने परिसरातील लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सदर कम्युनिटी किचनसाठी दिनकर कांबळे, पांडुरंग बाबर, शशिकांत बाबर, आकाश वाघमारे, सिद्धेश कांबळे, स्वप्नील बाबर, ऋषिकेश काटे, तुळशीराम कांबळे, अस्मिता  बाबर, सतिश वायदंडे, वर्षा कांबळे, पूजा बाबर आदी विशेष परिश्रम घेत आहेत. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments