विटा येथे वर्धमान महावीर जयंती निमित्ताने प्रसाद वाटप ; श्री विटा जैन संघा तर्फे नगरपरिषद, पोलीस स्टेशन व नगरपरिषद सफाई  कर्मचारी यांचे प्रति कृतज्ञता

विटा येथे वर्धमान महावीर जयंती निमित्ताने प्रसाद वाटप ; श्री विटा जैन संघा तर्फे नगरपरिषद, पोलीस स्टेशन व नगरपरिषद सफाई  कर्मचारी यांचे प्रति कृतज्ञता


विटा येथे वर्धमान महावीर जयंती निमित्ताने प्रसाद वाटप
श्री विटा जैन संघा तर्फे नगरपरिषद, पोलीस स्टेशन व नगरपरिषद सफाई  कर्मचारी यांचे प्रति कृतज्ञता
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी :  देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गाविरुध्द लढा देणाऱ्या विटा नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी व विटा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी यांना आज वर्धमान महावीर जयंतीचे औचित्य साधत श्री विटा जैन संघा तर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले.
जैन समाज संघाचे अध्यक्ष विलासभाई शहा, क्रांतीलाल जोगड, प्रकाशभाई शहा, अरुण शहा, अशिष शहा, विजय शहा, निलेश शहा, जितेश शहा, अजिंक्य शहा, परिन शहा, रितेश शहा, साहिल शहा यांचेसह सर्व जैन समाज विटा यांनी महावीर जयंतीनिमित्ताने हा सामाजिक उपक्रम केला आहे.
संपूर्ण शहर बंद असताना विटेकरांची सेवा करणारे, कर्तव्यावर असलेले आणि सातत्याने शहर स्वच्छता करणारे नगरपरिषद सफाई कर्मचारी  व शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवणारे पोलीस कर्मचारी यांना मदत देऊन त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष संजय तारळेकर, कार्यालयीन अधिक्षक बाजीराव जाधव, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, नितीन चंदनशिवे, राजू पाटील, किरण जगताप यांचेसह नपा कर्मचारी व जैन समाज संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a comment

0 Comments