धक्कादायक : सोलापूर जिल्ह्यात १० नवे कोरोना रुग्ण ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

धक्कादायक : सोलापूर जिल्ह्यात १० नवे कोरोना रुग्ण ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

धक्कादायक : सोलापूर जिल्ह्यात १० नवे कोरोना रुग्ण ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १० नवे कोरोना आढळून आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील 2 कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या उर्वरित 42 जणांचे रिपोर्ट आले असून 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 32 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.सर्व रुग्णांवर सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत सोलापूर शहरात एकूण 12 रुग्ण कोरोना चे आढळले आहेत, त्यापैकी एकाच मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नागरिकांनी घरातून बाहेर निघू नका जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांना सहकार्य करा असे आवाहन केले आहे.

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments