Type Here to Get Search Results !

माणदेशातील ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन 


माणदेशातील ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड : माणदेशातील ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे निधन वयाच्या ८९ वर्षी पुणे येथे आज दि. २६ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले व परिवार आहे.
उत्तम झाले. बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होतीच; पण उतारवयातील त्यांना आणि पत्नीला पक्षघात झाल्याने अडचणींमध्ये आणखीच भर पडली होती. मागील वर्षी त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे वास्तव समोर आणल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्यांना पाच लाखांची मदत करण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील तुपेवाडी या छोट्या खेड्यात तुपे यांचा जन्म झाला. अल्पशिक्षित असूनही त्यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले. कादंबरी, लघुकथा, नाटक आणि आत्मकथन या प्रकारांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. उपेक्षित, वंचित समाजाच्या वेदना-व्यथा त्यांच्या साहित्यातून चित्रित झाल्या. 


हे ही वाचा :-   श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीचे प्रा.सदाशिव मोरे यांच्याकडून कोरोनाची अशी ही जनजागृती


साहित्य अकादमीपासून अनेक पुरस्करांचे मानकरी ठरलेल्या उत्तम तुपे यांची राज्य सरकाराने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणून देखील निवड केली. कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले. 'भस्म' या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर 'काट्यावरची पोटं' या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कार मिळाला. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपे यांनी लिहिलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies